पैलवान सुभाषदादा पाटील युथ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२५-२६
पुणे : पैलवान सुभाषदादा पाटील युथ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२५-२६ अंतर्गत संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व पत्रकार) यांची राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सामाजिक कार्य, नवउद्योजकता, कृषीक्षेत्र, कला-रंजन आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातून प्राप्त झालेल्या अर्जांमधून नांदेडकर सरांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनकडून देण्यात आली.
पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नांदेडकर सरांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर पत्रकारितेद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत झाली आहे.
लवकरच हा पुरस्कार सोहळा भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये नांदेडकर सरांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
