Spread the love

रस्त्यावर पडलेले व तोबकळणारे पोल; नागरिकांचा संताप, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची

पिंपरी-चिंचवड :  निगडी–रावेत येथील BRT बस स्थानक परिसरात गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भक्ती शक्ती उद्यान पाठीमागील बस स्थानकाजवळ रस्त्यावर लोखंडी पोल पडलेल्या अवस्थेत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी पोल धोकादायकरीत्या तोबकळत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेषतः बसमध्ये चढ-उतार करण्याच्या ठिकाणीच ही धोकादायक परिस्थिती असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात PMPML च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनाही या प्रकाराची माहिती देत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी नोंदवली असून, “

Share.
Leave A Reply

Exit mobile version