Spread the love

> केतकीबेन पटेल सेंट्रल लायब्ररीस देवेंद्र फडणवीस यांची भेट

शिरपूर : शिरपूर शहरात जलसंधारणासोबतच शिक्षण, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात झालेली प्रगती ही राज्यासाठी पथदर्शी आहे. येथील सेंट्रल लायब्ररी विद्यार्थ्यासाठी ज्ञानकेंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच शिरपूर येथील केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिरपूरमध्ये राबविण्यात आलेले जलसंधारण मॉडेल यापूर्वी राज्यात आदर्श ठरले असून, आता शिक्षण क्षेत्रातही शिरपूरने देशपातळीवर वेगळा ठसा उमटविला आहे. शहरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, सेंट्रल लायब्ररी तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आमदार पावरा यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version