Spread the love

सौरव चव्हाण प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने संस्थेची गौरवशाली परंपरा कायम

पुणे प्रतिनिधी | शंकर जोग

सोनाई इंग्लिश मीडियम हायस्कूल व सायन्स ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेत चि. सौरव अंकुश चव्हाण याने ९८.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. तर कु. सानिया मनोर बाबू रेड्डी हिने ९५ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच चि. नतिक अनिल पवार याने ९४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

कठोर परिश्रम आणि शिस्तीचे फळ

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए. एल. नरसिंगराव यांनी व्यक्त केले. “विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत संस्थेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. हे यश शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे,” असेही त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बनकर, ट्रस्टी स्वर्णा रावराज लक्ष्मणराव तसेच शिक्षक राम मनोहर रेड्डीसोनिया मोरे आणि संदेश मोरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकवृंद, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version