Spread the love

 शिरपूर चोपडा महामार्गावर वाहनांच्या रांगा……

शिरपूर, धुळे (सुनील निकम) : शिरपूर चोपडा महामार्गावर केमिकलने भरलेला ट्रक उलटल्याने ट्रकला भीषण आग लागल्याची घटना शिरपूर तालुक्यातील सावर गावाजवळ घडली आहे. ट्रक उलटून भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घडलेल्या घटनेनंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने दोघेही बचावले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास थाळनेर पोलीस करत आहे.

चोपड्याहून शिरपूरच्या दिशेने केमिकलने भरलेला ट्रक जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणी मुळे आनियंत्रित झालेला ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटताच ट्रकला भीषण आग लागली. असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही मिनिटातच आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केल्याने ट्रक जळून खाक झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सावरगावात चांगलीच खळबळ उडाली.

अपघात ग्रस्त ट्रकला बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचं काम थाळनेर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. नेमका हा अपघात कसा झाला? याचा तपास थाळनेर पोलीस करत आहे. मात्र यात दुर्घटनेत ट्रक सह मालाचं लाखो रुपयांचं नुकसान झाला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version