Spread the love

शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक, वह्या व गणवेशांचे वाटप; विद्यार्थ्यांना कांदापोहे व गुळाच्या जिलेबीचा अल्पोपहार

धरणगाव (विनोद मोरे) प्रतिनिधी :धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक, वह्या आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले.

शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. डी. माळी यांनी केले. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते गणवेश देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्ते दिनेशशेठ लोहार यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी कांदापोहे आणि गुळाच्या जिलेबीचा अल्पोपहार आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाला शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापडणे, एम. बी. मोरे, एस. व्ही. आढावे, एस. एन. कोळी, पी. डी. पाटील, व्ही. टी. माळी, व्ही. पी. वऱ्हाडे, नूतन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, अरुण शिरसाठ, ग्रंथपाल गोपाल महाजन, लिपिक जे. एस. महाजन, पी. डी. बडगुजर, अशोक पाटील आणि जीवन भोई यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आणि शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version