आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा; HPV लसीकरण आणि PMJY क्लेमच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त
पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी • विविध आरोग्य योजनांचा आढावा • NQAS, HPV लसीकरण, पल्स पोलिओ मोहिमेवर भर • कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना
गणेश रावळ प्रतिनिधी ।भडगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी भडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरखेड येथे भेट देत आरोग्य केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.
भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी NQAS, HPV लसीकरण, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) क्लेम, ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान, दैनंदिन ओपीडी व आयपीडी सेवा, प्रसूती सेवा, पल्स पोलिओ मोहीम, औषधांचा साठा, साथीच्या रोगांवरील नियंत्रण तसेच स्टॉप डायरेक कॅम्पेन आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.
आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या HPV लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी तसेच PMJAY क्लेमच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भविष्यातही नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक भोसले, आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर, आरोग्य सहाय्यक प्रदीप डाके, आरोग्य सहायिका भारती हरणे, औषध निर्माण अधिकारी विकास धुमाळ, रियंका पावरा, उदय जोशी, संगीता बाविस्कर, गट प्रवर्तक शिला कोळी, आशा महाजन, वाहनचालक अशोक बडगुजर यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या भेटीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यास निश्चितच बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
