Spread the love

३५ वर्षांच्या शैक्षणिक सेवेला मानवंदना; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही गौरव

मालपूर | प्रतिनिधी

स्वो. वि. संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मालपूर येथे मंगळवारी (३० जून) प्राचार्य ए. एन. पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रा. एस. एस. शेखएस. व्ही. सोनवणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण पानपाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोदजी भाऊसाहेब (शालेय ग्रंथपाल) उपस्थित होते, तर पर्यवेक्षक एस. पी. भावसार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ह.भ.प. रामचंद्रजी महाराज यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. ठाकरे यांनी केले. प्रारंभी त्यांनी सेवानिवृत्त मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. त्यानंतर रामचंद्रजी महाराज यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे कौतुक करत मार्गदर्शन केले.

यावेळी लक्ष्मण पानपाटील, प्रा. पी. व्ही. माळीपी. एन. निकम, प्राथमिक विभागातील वंजारी सर तसेच पर्यवेक्षक एस. पी. भावसार यांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची उजळणी केली.

प्राचार्य ए. एन. पाटील यांनी तब्बल ३५ वर्षे, तर प्रा. एस. एस. शेख यांनी जवळपास २८ वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वक्त्यांनी विशेष उल्लेख केला.

समारोपावेळी प्राचार्य ए. एन. पाटील, प्रा. एस. एस. शेख आणि एस. व्ही. सोनवणे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव, आठवणी, संघर्ष आणि विद्यार्थ्यांशी असलेले भावनिक नाते उपस्थितांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी एस. के. ठाकरे यांनी आभार मानले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version