Spread the love

पारोळा रोडवरील घटना; मनपा प्रशासनाने तातडीने हटवले झाड, मोठी जीवितहानी टळली

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरात दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसादरम्यान पारोळा रोडवरील कराचीवाला खुंट परिसरात एक जुने लिंबाचे झाड कोसळून दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने त्या वेळी परिसरात वर्दळ कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असतानाच अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या लिंबाच्या झाडाने अचानक कोसळून जवळील दोन दुकानांवर आदळले. या दुर्घटनेत दुकानांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच महापौरांसह महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू केले.

महापालिका प्रशासनाच्या पथकाने कोसळलेले झाड हटवून परिसरातील वाहतूक सुरळीत केली. पावसामुळे त्या वेळी नागरिकांची वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version