Spread the love

नगरपरिषद व नगरसेवकांचे दुर्लक्ष, तीव्र आंदोलनचा इशारा – संदेश घायतडक

जामखेड प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड: शहरातील मिलिंद नगर परिसरातील गटारींचे पाणी तसेच सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मिलिंद नगर प्रभाग क्रमांक सहा परिसरातील गटारीचे तसेच सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषद व नगरसेवकांचे या बाबींकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. तातडीने उपाय योजना करावी
नगराध्यक्ष व नगरपरिषद प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी निवेदनातून तीव्र आंदोलनाचा ईशाला देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मिलिंद नगर मधील कांबळे किराणा ते संजय वाघमारे या दरम्यान अंडरग्राऊंडर गटार / नालीमध्ये सांडपाणी तुंबले आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तसेच डासांची वाढ होत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये थंडी ताप मलेरिया, डेंगू सारखे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मिलिंद नगर परिसरात छोटे लहान बालक मुलांची संख्या जास्त असून सदर लहान मुले रस्त्यावर खेळत असतात या परिसरात दुर्गंधी तसेच सांडपाण्याची दुरावस्था झाली असून पाणी हे रस्त्यावर येत आहे. मिलिंद नगर परिसरात नगरपरिषदचे दुर्लक्ष असून सफाई कामगार व गटार साफ होत नाही.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, कांताबाई अंकुश गायकवाड, दीपाली अनिल वाघमारे, संजय राजाराम भोसले, संतोष लक्ष्मण डाडर, उमेश गायकवाड, संजय वाघमारे, पूनम अशोक कांबळे, राधा जाधव, मयूर जाधव, नितीन राऊत, सरस्वती गायकवाड, अक्षय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, कृष्णा साळवे आदी नागरिकांच्या सह्या आहेत चौकत
नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पावसाचे दिवस असल्याने गटारीचे पाणी व सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. – सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक.

Share.
Leave A Reply

Exit mobile version