Spread the love

भारत-तिब्बत मैत्री संघ, नोरगेलिंग तिबेटियन सेटलमेंट कॅम्प आणि बुद्धिस्ट मिशनचा संयुक्त उपक्रम; नागरिकांना भेट देण्याचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी

महामहीम दलाई लामा यांच्या ९०व्या जन्मवर्षानिमित्त भारत-तिब्बत मैत्री, शांतता, करुणा आणि बौद्ध संस्कृतीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारत-तिब्बत मैत्री संघ (महाराष्ट्र राज्य), नोरगेलिंग तिबेटियन सेटलमेंट कॅम्प (महाराष्ट्र) आणि बुद्धिस्ट मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे चित्रप्रदर्शन दि. २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये महामहीम दलाई लामा यांचे जीवनकार्य, तिबेटी संस्कृती, बौद्ध तत्त्वज्ञान, अहिंसा, मानवता आणि जागतिक शांततेचा संदेश देणारी विविध दुर्मीळ छायाचित्रे व चित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून तिबेटी समाजाचा सांस्कृतिक वारसा, भारत-तिब्बत मैत्रीचे दृढ संबंध तसेच भगवान बुद्धांच्या करुणा, मैत्री आणि शांततेच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

आयोजकांनी नागरिक, विद्यार्थी, बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते तसेच कला आणि संस्कृतीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

महामहीम दलाई लामा यांच्या ९०व्या जन्मवर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक उपक्रम शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा ठरणार असून, मुंबईकरांसाठी तिबेटी संस्कृती आणि बौद्ध विचार जाणून घेण्याची ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version