Spread the love

बांबरुड पाटस्थळ येथील कानोबा महाराज मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम; ग्रामस्थ व परदेशी परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग

स्व. कोंडामाई परदेशी यांना अनोखी श्रद्धांजली • ५७७ वृक्षांचे वृक्षारोपण • कानोबा महाराज मंदिर परिसर हिरवागार • पर्यावरण संवर्धनाचा संदेश • ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

भडगाव | प्रतिनिधी :

भडगाव तालुक्यातील बांबरुड पाटस्थळ येथील स्वर्गीय जिजाबाई (कोंडामाई) संतोषसिंग परदेशी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. कानोबा महाराज (कानिफनाथ महाराज) मंदिर परिसर व टेकडीवर तब्बल ५७७ वृक्षांचे वृक्षारोपण करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

१७ जून २०२६ रोजी स्व. कोंडामाई यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि भावी पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वड, पिंपळ, निंब यांसारख्या पर्यावरणपूरक व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमात बांबरुड पाटस्थळ येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तसेच स्व. कोंडामाई यांचे चिरंजीव रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी (पोलीस अधीक्षक, एसआरपीएफ, पुणे)डॉ. अरुणा राजपूत (कृष्णा हॉस्पिटल, सिल्लोड)डॉ. करूणा संतोषसिंग परदेशीदिनकर कौतिक पाटीलजितेंद्र जयसिंग परदेशीअक्षय संजय परदेशीमनोज परदेशी तसेच परदेशी परिवारातील सदस्यांनीही वृक्षारोपण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत, “स्मृती अमर राहतात, जेव्हा त्या निसर्गाच्या रूपाने फुलतात,” अशी भावना व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनासह सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version