Spread the love

राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या निर्देशानुसार नियुक्त्या; नागरिकांच्या प्रश्नांवर धर्मनिरपेक्ष भूमिकेतून काम करण्याचा निर्धार

धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मान्यतेने धुळे जिल्ह्यात पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीनुसार रियाज अली शेख यांची जिल्हाध्यक्ष, शोएब अन्सारी यांची शहराध्यक्ष, तर सनी वाडेकर यांची युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर AIMIM च्या मुख्य कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पक्षाचे नेते इर्शाद भाई जागीरदार, गटनेते लल्लू शेठ अन्सारी, नगरसेवक वसीम मंत्रीसाजिद अली साईशब्बीर पिंजारीमुखर्जीआमिर पठाणमिर्झा तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना इर्शाद भाई जागीरदार यांनी AIMIM हा सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर कार्य करत असून सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version