Spread the love

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव; शिक्षक व केंद्रप्रमुखांचाही सत्कार

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा येथे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मराठा गौरव युवराज (भाऊ) काशिद, सरपंच अजय (दादा) काशिदमकरंद (आबा) काशिद आणि केंद्रप्रमुख माजिद शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या साक्षी गोवर्धन मुळे, पूनम राम जगदाळे आणि पवन दादासाहेब जगदाळे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. या यशामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ₹७,५०० प्रमाणे दोन वर्षांसाठी एकूण ₹१५,००० शिष्यवृत्ती मिळणार आहे.

यंदा इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या १३ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली, तर NMMS परीक्षेत पात्र ठरलेल्या ११ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती संपादन केली. या उल्लेखनीय यशाबद्दल इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक राहुल लिमकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत १५ विद्यार्थी पात्र झाल्याबद्दल वर्गशिक्षिका अमृता रसाळ यांचाही गौरव करण्यात आला.

याप्रसंगी सारोळा शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा राजुरी केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख माजिद शेख यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उत्कृष्ट शिष्यवृत्ती निकालाचे कौतुक करत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, मुख्याध्यापक संदीप भालसिंग, शिक्षक सुरेश बर्वे, राहुल लिमकर, प्रशांत होळकर, शबाना शेख, वृषाली खांदवे, अमृता रसाळ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version