Spread the love

आयटक संघटनेचा इशारा; राज्यस्तरीय निर्देश असूनही दबाव टाकला जात असल्याचा आरोप

जळगाव | प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका, मदतनीस, गट प्रवर्तक तसेच आशा वर्कर्स यांच्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संबंधित कामाची जबाबदारी टाकू नये, या मागणीसाठी आयटक संघटनेच्या वतीने आज (दि. ६ जुलै २०२६) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

आयटक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यस्तरावरून BLO चे काम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर दबाव टाकून हे काम करून घेतले जात आहे.

या प्रकारामुळे नियमित आरोग्य व बालविकासाशी संबंधित कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे संबंधित आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून अंगणवाडी सेविका, मदतनीस, गट प्रवर्तक आणि आशा वर्कर्स यांना BLO कामातून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष सौ. प्रेमलता पाटील यांनी BLO कामावर बहिष्कार जाहीर करत प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशाराही दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version