१३ वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल; पुरस्काराने साकत आणि जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील साकत गावचे भूमिपुत्र तथा युवा पत्रकार बापुसाहेब रावसाहेब घोडेस्वार यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यानगर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, फेटा, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम भैया जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशीराम भोजने होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी, शर्मिलाताई नलवडे, रेश्मा पुणेकर, ज्योती पवार, मच्छिंद्र बीडगर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. आबासाहेब यादव, राजेंद्र पोकळे, शिवदास काळे, शोभाताई विवेक पंडित, साई सागर पंडित, शिवाजीराव वाघ, शहाबुद्दीन शेख, अमोल जाधव, अंकुश जगताप, भास्करराव नेहूल, दिवटे महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार सुनील नजन यांनी सूत्रसंचालन केले, तर अजय जाडकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या सन्मानानंतर बापुसाहेब घोडेस्वार यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.o
गेल्या १३ वर्षांपासून बापुसाहेब घोडेस्वार यांनी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक तसेच जनहिताच्या प्रश्नांवर सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे साकत गावासह संपूर्ण जामखेड तालुक्याचा गौरव वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
