Spread the love

नीरज शिवरामे २१ एप्रिलपासून बेपत्ता; माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्याचे कुटुंबीयांचे आवाहन

नशिरबाद (जळगाव) | प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील नशिरबाद येथील रहिवासी नीरज शिवरामे हा तरुण दि. २१ एप्रिल २०२६ रोजी आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला असून, गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली असून त्यांनी नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज कोणालाही कोणतीही माहिती न देता घरातून निघून गेला. त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद असून, सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही.

नीरजचा शोध लागावा यासाठी कुटुंबीयांनी समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. नीरजबाबत अचूक माहिती देणाऱ्या किंवा त्याचा शोध लावण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस १०,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.

नीरज शिवरामे याच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा तो कोठेही दिसून आल्यास तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क क्रमांक :
सूरज शिवरामे: ७६६६५२०९८५
विजय महाजन: ९६३७९७५६९२

Share.
Leave A Reply

Exit mobile version