Spread the love

ओबीसी, विमुक्त-भटक्या आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांची ऑफलाइन प्रशिक्षण योजना; ७५ टक्के उपस्थितीवर विद्यावेतनाची सुविधा

नशिराबा | धीरज सैतवाल ।  प्रतिनिधी

इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील तरुणांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पोलिस व मिलिटरी भरती परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑफलाइन प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेचा अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जळगाव तालुका अध्यक्ष मनोज नाले यांनी केले आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :

  • प्रशिक्षण पूर्णपणे अनिवासी (Non-Residential) स्वरूपाचे असेल.

  • प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल.

  • १० वी उत्तीर्ण आणि नॉन-क्रिमिलेअर गटातील महाराष्ट्रातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

  • उमेदवारांची निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल.

  • प्रशिक्षणादरम्यान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या नियमानुसार विद्यावेतन दिले जाईल.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Notice Board’ मधील “Application for Competitive Training Program 2026-27” या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जुलै २०२६

महत्त्वाची सूचना :
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योती किंवा सारथी संस्थेच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये, असे महाज्योतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version