Spread the love

अन्न सुरक्षा विभाग व फैजपूर पोलिसांची संयुक्त कारवाई; तुळशी पान अँड कोल्ड्रिंक्स दुकानातून गुटखा जप्त

फैजपूर | प्रतिनिधी

फैजपूर-यावल रोडवरील तुळशी पान अँड कोल्ड्रिंक्स या दुकानावर अन्न सुरक्षा विभाग आणि फैजपूर पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला. या प्रकरणी दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.४० वाजता ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात कर्मचंद पान मसाला या प्रतिबंधित गुटख्याची १९ पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ३ हजार ४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तुळशीदास दिगंबर चौधरी (वय ३६, रा. आराधना कॉलनी, फैजपूर, ता. यावल) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

मानवी आरोग्यास अपायकारक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गावभणे करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version