हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या दर्ग्यात भाविकांची मोठी उपस्थिती; मुस्लिम बांधवांकडून स्वागत व सत्कार
संदीप पाटील पारोळा | प्रतिनिधी
पारोळा शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मिश्किन शाह बाबा दर्ग्यात आयोजित ऊर्स शरीफ कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देत ऊर्स सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अमृत चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीष पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठाण, नगरसेवक नितीन सोनार, मनोज जगदाळे, भूषण टिपरे, पंकज मराठे, इम्रान शेख सलीम, नजीर खान बेलदार, माजी नगरसेवक अमोल पाटील, दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी, ट्रस्टी मंडळाचे सदस्य, मुस्लिम समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊर्स शरीफ निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात देशात शांतता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी एकात्मता आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देत हा सोहळा उत्साहात साजरा केला.
