पत्रकारांच्या हक्क संरक्षण व संघटन बळकटीवर भर; आधुनिक पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याची संघटनेची घोषणा
कल्याण | प्रतिनिधी
कोकण विभाग पत्रकार संघाची ठाणे जिल्हा (शहर) कार्यकारिणी उत्साहपूर्ण वातावरणात जाहीर करण्यात आली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटन अधिक सक्षम करणे आणि पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा व विविध शहरांच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
कल्याण येथे सोमवारी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील होते. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र देशमुख तसेच पालघर जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सांबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ठाणे जिल्हा कार्यकारिणी
ठाणे जिल्हाध्यक्षपदी विजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी महादेव पंजाबी, सचिवपदी आनंद पद्मनाभन व प्रफुल केदारे, सहसचिवपदी करण शर्मा, तर कोषाध्यक्षपदी गोपाल शर्मा यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून मीनल पवार, हरिप्रकाश तिवारी आणि दीपक इंगळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कल्याण शहर कार्यकारिणी
कल्याण शहराध्यक्षपदी संदीप शेंडगे, डोंबिवली शहराध्यक्षपदी शरद शहाणे, डोंबिवली महिला विभाग अध्यक्षपदी सारिका शिंदे, उपाध्यक्षपदी विद्या कुलकर्णी, तर नवी मुंबई शहराध्यक्षपदी रामचंद्र खडपे यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय कार्याध्यक्षपदी मच्छिंद्र कांबळे, सचिवपदी जितेंद्र कानडे, उपाध्यक्षपदी संभाजी आत्माराम मोरे, अजय शेलार, सुधीर लवांदे व नारायण सुरोशे, सहखजिनदारपदी सचिन कानडे, सहसंघटकपदी राहुल उघडे, संघटकपदी दिनेश जयस्वाल व तानाजी लोणे, सहसचिवपदी संजय भोराडे, तर सदस्य म्हणून सुभाष शेंडगे, विनोद लोखंडे, साईनाथ ठाकरे, भगवान सुरळके आणि रितेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत बोलताना संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांनी पत्रकारांची एकजूट, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि संघटनात्मक बळ यांचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारांसाठी मोफत माहिती अधिकार (RTI) प्रशिक्षण, आधुनिक पत्रकारितेतील नवीन तंत्रज्ञान व विविध अभ्यासक्रमांचे नियमित प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी जयेश शेलार पाटील, रवींद्र देशमुख आणि ॲड. सिद्धार्थ सांबरे यांनी पत्रकारितेतील बदलते स्वरूप, व्यावसायिक नैतिकता आणि संघटितपणे कार्य करण्याच्या गरजेवर मार्गदर्शन केले.
नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर उपस्थित पत्रकारांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
