Spread the love

पालक-शिक्षक संघ व माता-पालक संघाची सर्वानुमते निवड • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

धरणगाव | प्रतिनिधी । वाल्मिक पाटील

धरणगाव येथील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त पालक-शिक्षक सभा तसेच माता-पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी पालक-शिक्षक संघ आणि माता-पालक संघाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. सहविचार सभेचे प्रास्ताविक पालक-शिक्षक समिती प्रमुख पी. डी. पाटील यांनी केले. उपस्थित पालक आणि मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सभेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक जे. एस. पवार, उपाध्यक्षपदी सुनील सुक्राम भिल, सचिवपदी पी. डी. पाटील तसेच प्रत्येक वर्गातून दोन पालक प्रतिनिधींची सभासद म्हणून निवड करण्यात आली. माता-पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सुरेखा करोसिया तर सचिवपदी व्ही. पी. वऱ्हाडे यांची सर्वानुमते निवड झाली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पालक-शिक्षक समितीचे प्रमुख एच. डी. माळी यांनी पालक-शिक्षक संघाची उद्दिष्टे, शालेय शिस्त, शिष्यवृत्ती, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध स्पर्धांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपास पेटी, चित्रकला वही आणि पेन देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक आणि पालक या दोघांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगत, परस्पर समन्वयातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.

या सभेला समाधान भिल, वेचान बारेला, महाग्या बारेला, अनिल भोई, विकी चंडाले, मनोज सोनवणे, नितीन चंडाले, रवी करोसिया, सुरेखा करोसिया, भारती चंडाले, अकिलशहा फकीर, उषा कुंभार, सुलोचना करोसिया, मनीषा बारेला, बापू भिल यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार एच. डी. माळी यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version