Spread the love

जिल्हा रुग्णालयात विशेष हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; गरजू रुग्णांना जिल्हास्तरावरच अत्याधुनिक उपचार

धुळे | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय यांच्या समन्वयाने राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’ अभियानांतर्गत धुळे जिल्हा रुग्णालयात विशेष हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५ रुग्णांवर यशस्वी अँजिओप्लास्टी तर १२ रुग्णांची अँजिओग्राफी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी भाग्यश्री वीसपुते आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिरात हृदयरोगाचे निदान, तपासणी, उपचार आणि जनजागृती करण्यात आली. डॉ. प्रांजल पाटील आणि डॉ. दीपक शिंदे या हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी यशस्वीरीत्या पार पडल्या. जिल्हास्तरावरच अत्याधुनिक हृदयरोग उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाने नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी करून हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version