Spread the love

सिमेंटमध्ये पुरेसे पाणी नसल्याचा दावा; कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा–कजगाव मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. काम निकृष्ट दर्जाचे होत असून सिमेंट काँक्रीटमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी वापरले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान सिमेंट मिश्रण कोरडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात रस्ता लवकर खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या कामाची संबंधित विभागाने तातडीने तांत्रिक तपासणी करावी, कामाची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासावी आणि निकृष्ट काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, हे काम कोणत्या कंत्राटदारामार्फत सुरू आहे, याबाबत विविध चर्चा सुरू असून संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच त्याबाबत स्पष्टता होऊ शकणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version