Spread the love

अहिरणी भाषा व खानदेशी संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्याची दखल; नाशिक येथे सन्मान

यावल | प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरणी भाषा संवर्धन परिषद यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात यावल तालुक्यातील कासारखेडा येथील रहिवासी आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय ‘रील स्टार’ सौ. कविता तुषार पाटील यांना ‘डॉ. दा. गो. बोरसे पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिरणी भाषा, खानदेशी संस्कृती आणि लोककलेचा प्रचार-प्रसार करत स्वतंत्र ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानानंतर कासारखेडा गावासह यावल तालुका आणि जळगाव जिल्ह्यातील विविध स्तरांतून सौ. कविता पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version