नगराध्यक्षांनी स्वतः तपासले रुग्ण, असंख्य रुग्णांच्या आरोग्याची तपासणी….
पिंपळनेर, धुळे प्रतिनिधी
जनआरोग्य शिबिर अन सर्वसामान्य रुग्णांच्या विविध आरोग्याच्या तपासण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आल्या आहे. पिंपळनेर मधील सुहरी हॉस्पिटल, आदित्य फाउंडेशन व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासल्यास शस्त्रक्रियेची सुविधा देखील विविध योजनेच्या माध्यमातून मोफत होणार असल्याची माहिती डॉ. जितेश चौरे यांनी दिली आहे.
या आरोग्य शिबिरात पिंपळनेर सह ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांच्या आरोग्य विषयी विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आहे. यात असंख्य रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करत मोफत औषध देखील देण्यात आले आहे. यावेळी रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले आहे.
या आरोग्य शिबिरात शुगर, इसीजी, रिपीट प्रोफाइल, हृदयरोग, सिरम यूरिक ॲसिड, स्त्रीरोग, अस्थिरोग यांसह विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या आहे. या जन आरोग्य शिबिराचा पिंपळनेर शहरासह ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ योगिता चौरे यांनी स्वतः रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करत त्यांच निदान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करता महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची घेतलेली काळजी, समाजउपयोगी, जनहिताच्या दृष्टीने, महत्त्वाचा असणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा डॉ. योगिता चौरे, डॉ. जितेश चौरे, हृदयरोग तज्ञ दीपक शिंदे, अस्थिरोग तज्ञ डॉ कोमल अहिरराव, स्त्रीरोग तज्ञ जीवन शर्मा यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
