Spread the love

अनेक वर्षांची मागणी मार्गी; सुरक्षित व सुकर वाहतुकीचा मार्ग मोकळा

एरंडोल | प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द गावातील अंतर्गत काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या विकासकामामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असून, पावसाळ्यातील चिखल आणि उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीच्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे.

गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना सुरक्षित आणि सुकर प्रवास करता येणार आहे. तसेच परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक सुरेश सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती मोहनभाऊ सोनवणेनारायण सोनवणे, पन्नालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, सतीश सोनवणे, दगडू सोनवणे, साहेबराव कोळी, सोमा कोळी, किशोर सोनवणे, जनार्दन कोळी, ग्रामपंचायत अधिकारी योगेश चंदनकर, बांधकाम ठेकेदार सुधाकर कोळी, ग्रामपंचायत लिपिक भाईदास कोळी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version