Spread the love

कुंभार समाजातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

नशिराबाद | प्रतिनिधी

नशिराबाद येथे राष्ट्रसंत श्री संत गोरोबाकाका कुंभार यांची ७५९ वी जयंती भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कुंभार समाजातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात नशिराबाद कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार यांच्या हस्ते संत गोरोबाकाकांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून झाली. यावेळी संतांच्या विचारांचे स्मरण करत समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला.

जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी रवींद्र कुंभार, हरचंद कुंभार, हरीश कुंभार, राहुल कुंभार, दिनेश कुंभार, सागर कुंभार, मंगेश कुंभार, सुभाष कुंभार, सचिन कुंभार, जयंत कुंभार, विजय कुंभार आणि राजू कुंभार यांच्यासह समस्त कुंभार समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संत गोरोबाकाकांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version