Spread the love

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

कर्मचारी हित, संघटन बळकटी आणि प्रशासनाशी समन्वयातून महानगरपालिकेच्या विकासाचा निर्धार

जळगाव | प्रतिनिधी

नगरपरिषद-महानगरपालिका कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या वतीने आयोजित कार्यकारिणी पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कर्मचारी हित, संघटन बळकटी आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी प्रशासन व कर्मचारी यांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहरचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे होते, तर महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते पी. जे. आप्पा पाटील तसेच जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मचारी संघटनांची भूमिका, प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनहिताला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कर्मचारी कल्याणासाठी संघटनेने प्रभावीपणे काम करण्यासह प्रशासनाशी समन्वय राखून महानगरपालिकेच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला शाखाध्यक्ष गौरव सपकाळे, कार्याध्यक्ष समीर बोरोले, सचिव गौरव पुराणिक, उपाध्यक्ष अतुल पाटील, सहसचिव महेश ठाकूर, मुख्य सल्लागार योगेश बोरोले, सल्लागार योगेश वाणी, कोषाध्यक्ष शुभम कोतकर, प्रसिद्धी प्रमुख आकाश जगताप, संघटक संजय ठाकूरचंद्रशेखर तायडे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, महानगरपालिका कर्मचारी आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version