अण्णानगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
२९ जुलै रोजी श्री गजानन महाराज मंदिरात भगव्या ध्वजाचे पूजन; स्वयंसेवकांना उपस्थितीचे आवाहन
नशिराबाद | प्रतिनिधी (धीरज सेतवाल) :
अण्णानगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. सामाजिक जीवनात गुरूचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात येणार असून, स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेनुसार भगवा ध्वज हा प्रेरणा, त्याग आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक मानून गुरूच्या स्वरूपात पूजला जातो. गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात ध्वजपूजनासह संघकार्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे :
-
दिनांक : २९ जुलै २०२६ (बुधवार)
-
वेळ : सायंकाळी ७.०० ते ८.००
-
स्थळ : श्री गजानन महाराज मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णानगर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॉ. गणेश पाटील यांनी सर्व स्वयंसेवक बंधूंना वेळेवर उपस्थित राहून गुरुपौर्णिमा उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
