Spread the love

धरणगावात गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन

जय भवानी मित्र मंडळातर्फे अभिवादन; मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व पूजन

धरणगाव | प्रतिनिधी : अजय बाविस्कर

धरणगाव येथे जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी आणि मेडिकल असोसिएशनचे सचिव छोटू जाधव यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

त्यानंतर माजी नगरसेवक अहेमद पठाणनंदू पाटीलरवी जाधवकमलेश बोरसेरोहित चौधरीविलास महाजनविनोद रोकडेकैलास इंगळे आणि परेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला चंद्रकांत जाधव, वैभव पाटील, शाम पाटील, कुणाल चौधरी, कृष्णा जाधव, आकाश खैरनार, हर्षल पाटील यांच्यासह जय भवानी मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version