Spread the love

कुणाल पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून खाटूश्याम दर्शनासाठी महिलांचा प्रस्थान

विनोद चव्हाण यांचा पुढाकार; शेकडो महिला देवदर्शनास रवाना, मंत्रीपदासाठी प्रार्थनेचा संकल्प

सुनील निकम धुळे | प्रतिनिधी

माजी आमदार कुणाल पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, या हेतूने सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप पदाधिकारी विनोद चव्हाण यांच्या पुढाकारातून सडगाव परिसरातील शेकडो महिला राजस्थानातील खाटूश्याम व सावरिया सेठ यांच्या दर्शनासाठी रवाना झाल्या.

माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या मातोश्री लताबाई पाटील यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात महिलांनी “खाटू श्याम बाबा की जय” आणि “सावरिया सेठ की जय” अशा घोषणांनी दर्शन यात्रेला सुरुवात केली.

विनोद चव्हाण यांनी सांगितले की, आर्वी जिल्हा परिषद गटातील हजारो महिलांना देवदर्शन घडविण्यासोबतच कुणाल पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, या उद्देशाने हा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमात आर्वी गटातील तेरा गावांतील महिला सहभागी होत असून त्या खाटूश्याम आणि सावरिया सेठ यांच्या चरणी प्रार्थना करणार आहेत.

देवदर्शनासाठी रवाना होताना महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यात्रेदरम्यान भक्तिगीत आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी लताबाई पाटीलविनोद चव्हाणकैलास सूर्यवंशीगोलू पाटीलसोपान पाटीलसमाधान पाटीलविवेक पद्मारप्रवीण वडपतेतानाजी बागलेनितीन वडपतेगुलाब आयनोरभूषण वाघबापू मालचेयोगेश राठोडआनंदा बागले यांच्यासह शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version