Spread the love

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ. सुनीता खडके; १६ तालुकाध्यक्षांची घोषणा

संघटनेच्या पुनर्रचित कार्यकारिणीची घोषणा; शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून, सौ. सुनीता मिलिंद खडके यांची जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. याचवेळी जिल्ह्यातील १६ तालुक्यांसाठी नव्या तालुकाध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली.

ही कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पवार आणि विभागीय अध्यक्ष संभाजी आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेचे संघटनात्मक बळ वाढणार असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक, प्रशासकीय, वेतन, सेवा विषयक आणि इतर प्रलंबित प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

यावेळी प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे तसेच माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संघटनेचा विस्तार करताना शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी निष्ठेने आणि एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे :

  • पाचोरा – चंद्रकांत बाजीराव पाटील

  • धरणगाव – सुधाकर रामचंद्र पाटील

  • एरंडोल – राजेंद्र त्र्यंबक पाटील

  • पारोळा – रामकृष्ण मनसुख पाटील

  • जामनेर – गजानन एकनाथ पाटील

  • भडगाव – रोहन राजेंद्र परदेशी

  • जळगाव शहर – मयूर रावसाहेब पाटील

  • जळगाव ग्रामीण – सचिन दिलीप चव्हाण

  • भुसावळ – शरद चुडामन पाटील

  • रावेर – पंकज राजू पाटील

  • यावल – अमजद खान जबर खान

  • मुक्ताईनगर – दिलीप श्रीराम पाटील

  • चाळीसगाव – जहिरुद्दीन सिराजुद्दीन शेख

  • चोपडा – जगदीश आत्माराम पाठक

  • अमळनेर – राजेंद्र श्रीराम पाटील

  • बोदवड – मयूर अशोक सत्रे

जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्ष आणि जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुनीता मिलिंद खडके यांचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे पदाधिकारी, सभासद तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version