Spread the love

धरणगाव येथील के. जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

मुख्याध्यापक वाल्मीक पाटील यांच्या हस्ते पूजन; विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

धरणगाव | प्रतिनिधी :

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी धरणगाव येथील के. जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात मुख्याध्यापक वाल्मीक पाटील यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, योगदान आणि सामाजिक एकता यांचा सन्मान करण्याचा संदेश त्यांनी दिला.

यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही पूजनात सहभाग घेतला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी समाजाच्या संस्कृती व परंपरांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version