Spread the love

चोपड्यात राष्ट्रीय वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प संपन्न

‘बौद्ध लेण्या व स्तंभलेख’ विषयावर आयु. रमेश गोबा सोनवणे यांचे मार्गदर्शन; उपासक-उपासिकांची उपस्थिती

चोपडा | प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत चोपडा तालुक्याच्या वतीने गौतम नगर समाज मंदिर येथे राष्ट्रीय वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. वसंत बाबुराव शिंदे (बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभा) यांनी भूषविले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले.

‘बौद्ध लेण्या व स्तंभलेख’ विषयावर प्रवचन

वर्षावास प्रवचन मालिकेतील ‘बौद्ध लेण्या व स्तंभलेख’ या विषयावर आयु. रमेश गोबा सोनवणे (बौद्धाचार्य) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व, बौद्ध लेण्यांची परंपरा तसेच स्तंभलेखांच्या माध्यमातून जतन झालेला इतिहास याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

पदाधिकारी व उपासक-उपासिकांची उपस्थिती

यावेळी समता सैनिक दल प्रमुख आयु. शालिग्राम व्यंकट करंदीकर, जानकीराम शंकर सपकाळे, संजय पिरा अहिरे, रामचंद्र आखाडे सर, सुकदेव लक्ष्मण बाविस्कर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुकदेव लक्ष्मण बाविस्कर यांनी केले, तर शेवटी रामचंद्र आखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version