Spread the love

रोहित शर्माच्या प्रेमापोटी ओडिशातून मुंबईपर्यंत सायकल यात्रा; सुनील राऊत यांचा अनोखा प्रवास!

रोहित शर्माची भेट घेण्याच्या ध्यासाने १३०० ते १४०० किमीचा खडतर प्रवास; तिरंगा आणि क्रिकेटपटूच्या छायाचित्रासह निघाला तरुण

पाचोरा | प्रतिनिधी – वाल्मीक जाधव : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्यावरील अफाट प्रेम आणि त्याला प्रत्यक्ष भेटण्याच्या इच्छेतून ओडिशातील एका तरुणाने अनोखा निर्धार केला आहे. सुनील राऊत या तरुणाने ओडिशातील अंगुल येथून मुंबईपर्यंत सायकलने प्रवास सुरू केला आहे.

रोहित शर्माची भेट घेण्याच्या उद्देशाने सुनील राऊत तब्बल १३०० ते १४०० किलोमीटरचा खडतर प्रवास सायकलवरून करत आहेत. प्रवासादरम्यान ते सोबत भारतीय तिरंगा तसेच रोहित शर्माचे छायाचित्र असलेला मोठा फलक घेऊन जात आहेत.

या फलकावर त्यांच्या सायकल प्रवासाची माहिती तसेच सोशल मीडिया हँडल नमूद करण्यात आले आहे. विविध ठिकाणांहून प्रवास करताना नागरिकांचे लक्ष या अनोख्या सायकल यात्रेकडे वेधले जात आहे.

रोहित शर्माला भेटण्याचा ध्यास

रोहित शर्मावरील प्रेम आणि त्याला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनील राऊत यांनी हा खडतर प्रवास स्वीकारला आहे. क्रिकेटपटूच्या चाहत्यांमध्ये असलेल्या वेडाची आणि आपल्या ध्येयासाठी घेतलेल्या मेहनतीची ही अनोखी कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तिरंगा हातात घेऊन आणि रोहित शर्माचे छायाचित्र सोबत ठेवून सायकलवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सुनील राऊत यांच्या जिद्दीचे मार्गातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version