महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ एकपात्री प्रयोग
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वैचारिक कवी संमेलनाचेही आयोजन; कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग तसेच ‘तरी आम्ही बोलू नये’ या वैचारिक कवी संमेलनाचे आयोजन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, रॉक्सी टॉकीजजवळ, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांच्या हस्ते उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय मून राहणार आहेत. यावेळी पुणे येथील कवी आकाश अप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ एकपात्री प्रयोग
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग पुणे येथील प्रा. रमणी बबिता आकाश सादर करणार आहेत. रमाईच्या जीवनातील संघर्ष, त्याग, सामाजिक जाणिवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातील त्यांच्या योगदानाचा भावनिक व वैचारिक पट या प्रयोगातून उलगडणार आहे.
‘तरी आम्ही बोलू नये’ वैचारिक कवी संमेलन
यासोबतच ‘तरी आम्ही बोलू नये’ या वैचारिक कवितांच्या कार्यक्रमात प्रा. रमणी, श्रेया वाघ, अनिषा दोडके, जित्या जाली, किरण प्रकाश, स्वराज समदूर, विजय लोखंडे, प्रशिक तायडे, किशोर चक्रनारायण, सुमेध वंदना मधुकर, सुभाष गवळी आणि शुभम आव्हाळे आदी कवी सहभागी होणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास मंगल खिवंसरा, डॉ. ऋषीकेश कांबळे, अॅड. एस. आर. बोदडे, डॉ. धनराज गोंडाणे, अॅड. डी. व्ही. खिल्लारे, प्रा. विजयकुमार गवई, भीमराव सरवदे, अॅड. धनंजय बोरडे, प्राचार्य सुनील वाकेकर, प्राचार्य डॉ. नवनाथ गोरे, प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, सुमीत भुईगळ, अॅड. रामेश्वर तायडे, रूपचंद गाडेकर, सतीश गायकवाड, करुणा जाधव, डॉ. प्रमोद दुथडे, दौलत मोरे, इंजि. बी. के. आदमाने, डॉ. अरविंद गायकवाड, सुधाकर झिने, इंजि. एस. एस. भगत, इंजि. अशोक येरेकर, प्राचार्य डॉ. यशवंत खडसे, डॉ. भगवान धांडे, डॉ. कैलासचंद्र बनसोडे, एकनाथ पाखरे, मधुकर गवंदे, अंबादास रगडे, अनिलकुमार गायकवाड, व्ही. के. वाघ, डॉ. राजेंद्र अंकुशे, अशोक तिनगोटे, भीमराव बनसोड, अॅड. संदीप थोरात, स. सो. खंडाळकर, जनार्दन म्हस्के, डॉ. धोंडोपंत मानवतकर, सूर्यभान गजभिये (सोलापूर), रतनकुमार साळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांच्यासह दैवशीला गवंदे, शारदा गजभिये, शोभा खाडे, ललिता खडसे, बेबीनंदा पवार, राजकन्या गोंडाणे, मंगल मून, डॉ. ललिता गिहे, डॉ. वंदना पाटील, सुनंदा जाधव, सुरेखा चौरपगार, रत्नकला बनसोड, संघमित्रा खंडाळकर, सविता अभ्यंकर, जयश्री सरोदे, सरला सदावर्ते, चंद्रप्रभा शेगावकर, गंगाबाई सुरडकर, संध्या साळवे, फुलराणी वानखडे, मनिषा अंकुशराव, स्नेहा बनसोडे, विद्या साळवे, शारदा पगारे, मनिषा निसर्ग, मैना बोदडे, ज्योती निंबाळकर आदी परिश्रम घेत आहेत. या वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
