Spread the love

भुसावळमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य सायकल रॅली

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

भुसावळ | प्रतिनिधी :
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत ताप्ती पब्लिक स्कूलसह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलींवर तिरंगा ध्वज लावून रॅलीत सहभाग घेतला. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीचे उद्घाटन

सायकल रॅलीचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर, सायकलिंग असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, भुसावळ वाहतूक शाखेचे पीएसआय असलम खान, सहायक फौजदार संजय भदाणे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुनील वानखडे आणि प्रा. मनोज वारके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक विजय संकत यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रभक्तीचा संदेश

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला. तिरंगा ध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version