Spread the love

संभाजीनगरमध्ये शहर काँग्रेसचा पडेगाव येथे SIR आढावा दौरा

७ हजार नागरिकांचे फॉर्म भरून घेण्यात आल्याचा दावा; नागरिकांशी साधला थेट संवाद

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पडेगाव परिसरात SIR आढावा व संघटन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच SIR संदर्भातील विविध बाबींवर नागरिकांशी सविस्तर चर्चा केली.

या मोहिमेअंतर्गत यापूर्वी सुमारे ७ हजार नागरिकांचे फॉर्म भरून घेण्यात आल्याचा दावा शहर काँग्रेसकडून करण्यात आला. आजच्या दौऱ्यात आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमाला पडेगाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आढावा व संघटन दौऱ्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद अक्रम, शहर सचिव सय्यद झाकीरसंजयभाऊ धर्मरक्षक, पश्चिम विधानसभा अध्यक्ष तथा NSUI विद्यार्थी काँग्रेसचे शिरीष साठे, तसेच सय्यद जावेद, मोईन कुरेशी, आसाराम साठे, मयुर साठे, विशाल बंसलवाल, नईम बेग, जावेद पठाण, उमर शेख, सलमान सय्यद आणि अमीर शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

‘नागरिकांच्या हक्कांसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार’

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्षांनी नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच SIR मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा पाठपुरावा अधिक वेगाने करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version