येवती येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
भक्ती, कष्ट, समता आणि समाजसेवेचा संदेश; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
सतीश बावस्कर बोदवड प्रतिनिधी :
येवती, ता. बोदवड येथे ग्रामस्थांच्या वतीने संत सावता महाराज यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश दादा पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी संत सावता महाराज यांच्या जीवनकार्याचे स्मरण केले. संत सावता महाराज यांनी भक्ती, कष्ट, समता आणि समाजसेवेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाने एकोपा आणि बंधुभाव जपावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, माळी समाज बांधव, महिला तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांसह संत सावता महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात पार पडली.
