Spread the love

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवैध पिस्तूल व जिवंत काडतुसांसह संशयित जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त; आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी :

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गस्तीदरम्यान संशयित पोलिसांच्या ताब्यात

शनीपेठ पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपी परिसरात एक संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी तात्काळ शस्त्र व काडतुसे ताब्यात घेत संशयितास अटक केली.

आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल

या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १७२/२०२६ नुसार आर्म्स अॅक्ट कलम २५(१-बी)(अ) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्राचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात येणार होता, तसेच त्याचा अन्य गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोना महेंद्र पाटील, पोना पराग दुसाने, पोकॉ अमोल वंजारी, पोकॉ निलेश घुगे, पोकॉ गणेश ढाकणे आणि पोकॉ योगेश साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्राबाबत तसेच त्याच्या संभाव्य साथीदारांबाबत पुढील तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version