Spread the love

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयात पदभार स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी म्हणून श्रीमती संजीवनी जाधव-पाटील नुकत्याच रुजू झाल्या. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या श्रीमती जाधव-पाटील यांनी यापूर्वी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे सहायक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

पत्रकारिता क्षेत्रातही प्रदीर्घ अनुभव

श्रीमती जाधव-पाटील यांनी पत्रकारिता विषयात बी.जे., एम.जे. तसेच एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. प्रशासनात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी दैनिक लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून काम केले. तसेच आकाशवाणी केंद्रावर प्रादेशिक वृत्तनिवेदिका आणि एमसीएन (माध्यम) वृत्तवाहिनीवर निवेदिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

प्रशासकीय सेवा, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संजीवनी जाधव-पाटील यांच्या रुजू होण्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाला त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version