Spread the love

घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये दरड कोसळली; सहा जणांचा मृत्यू, चौघे जखमी

मुसळधार पावसाचा फटका; चाळीतील घरांवर डोंगराचा भाग कोसळला, बचावकार्य युद्धपातळीवर

मुंबई | धीरज सैतवाल, प्रतिनिधी

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगर परिसरात बुधवारी पहाटे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. दरड आणि मातीचा मोठा भाग चाळीतील घरांवर कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

घरांवर कोसळला डोंगराचा भाग

चिरागनगर परिसरातील गौसिया चाळ भागात पहाटेच्या सुमारास डोंगरावरील माती व मलबा अचानक खाली आला. त्याखाली दोन ते तीन घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

बचाव पथके घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे

दरम्यान, या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version