Spread the love

जांभोरे येथे तरुणांसाठी व्यायामशाळा व क्रीडांगणाची मागणी; १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घेण्याची मागणी

क्रीडा सुविधांच्या अभावामुळे तरुणांची गैरसोय; ग्रामसेवकांना निवेदन सादर

धरणगाव | प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथे तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा आणि क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी गावातील तरुणांनी ग्रामसेवकांना निवेदन सादर केले आहे. आगामी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष ग्रामसभेत या मागणीवर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करावा, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

क्रीडा सुविधांच्या अभावामुळे तरुणांची गैरसोय

गावात पुरेशा क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने तरुणांना मैदानी खेळ खेळण्यासाठी तसेच नियमित व्यायाम करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरुणांचे आरोग्य आणि क्रीडा कौशल्याला चालना मिळावी, यासाठी गावात सुसज्ज व्यायामशाळा आणि क्रीडांगण उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील तरुण एकत्र आले. तरुणांचे सूचक रुपेश भिल यांनी पुढाकार घेत ग्रामसेवकांना निवेदन सुपूर्द केले.

१५ ऑगस्टच्या ग्रामसभेकडे लक्ष

स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभेत या विषयावर सविस्तर चर्चा करून ठराव मंजूर करावा आणि त्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी तरुणांनी केली आहे. ग्रामसभेत सकारात्मक निर्णय होऊन गावात लवकरच क्रीडांगण व व्यायामशाळा साकारेल, अशी आशा तरुणांनी व्यक्त केली.

यावेळी संजय बिऱ्हाडे, अर्जुन मोहिते, विशाल बोरसे, कल्पेश पवार, ज्ञानेश्वर पवार, गोपाल पवार, हर्षल कोळी, नयनेश पवार, सुरज बेलदार, महेश हटकर, दिगंबर मालचे, नरेश बोरसे, उमेश चव्हाण, नवल कोळी, तुषार बोरसे, शाहरुख शेख, रोहित बोरसे, अजय कोळी, विजय कोळी, बादल चव्हाण, गौरव पाटील, गणेश निकम, राजेश हटकर, विशाल हटकर, अरुण सोनवणे, लवा सोनवणे, सुदर्शन पवार, अमोल अहिरे, हर्षल बिसेन, उदय पुरभे, दिवेश चव्हाण, सौरव सपकाळे, स्वप्नील निकम, रोशन मोरे, अभय परदेशी, सागर कोळी, मुकेश पवार, कल्पेश सोनवणे, प्रीतम गुजर, अर्जुन बेलदार, प्रदीप मोरे यांच्यासह गावातील अनेक तरुण उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version