पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल; विविध मान्यवर व पत्रकार बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव
पाचोरा | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका कार्याध्यक्षपदी पत्रकार संदिप कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे तसेच राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या सूचनेनुसार खान्देश विभागीय अध्यक्ष भुवनेश दुसाने यांनी संदिप कोळी यांची पाचोरा तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.
यावेळी विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार, पाचोरा तालुका अध्यक्ष गौतम सोनवणे, तसेच विनोद तावडे, स्वप्नील कुमावत, गजानन पाटील, निलेश पाटील, संदिप चव्हाण, छोटू सोनवणे आणि गुरुदास भालेराव यांनी संदिप कोळी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची अपेक्षा
संदिप कोळी यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर, पत्रकार बांधव आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना संघटितपणे वाचा फोडून पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पत्रकार संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आणि पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संदिप कोळी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास पत्रकार बांधवांनी व्यक्त केला.
