Spread the love

चौगावच्या कै. व्ही. एन. पाटील विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

सेवानिवृत्त उपशिक्षक भगवान गटलू बागले यांच्या हस्ते ध्वजारोहण; सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जागर

चौगाव | प्रतिनिधी : न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी संचलित कै. व्ही. एन. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चौगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक आबासो रवींद्र उत्तम शिरसाठ होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यदेवीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. रामकृष्ण दामू पाटील, माजी सरपंच श्री. अभिमन्यू दामू बागले, स्कूल कमिटी चेअरमन श्री. नानासाहेब प्रभाकर वेडू मासुळे, सहसचिव श्री. प्रमोद भाऊ वागले, विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एल. बोराळकर व पर्यवेक्षक श्री. के. पी. पदमर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर विद्यालयाचे सेवानिवृत्त उपशिक्षक श्री. भगवान गटलू बागले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकताच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून तिरंग्याला मानवंदना दिली.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या प्रशासक श्रीमती लीलाताई सिताराम बागले व त्यांचे प्रशासकीय मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, तरुण बांधव, पालक तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील शिक्षिका सौ. एस. ए. बागले यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एम. शिंदे व श्री. जे. बी. शिंदे यांनी प्रभावीपणे केले.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. परीक्षेत कोणत्याही गैरप्रकाराचा अवलंब न करता प्रामाणिकपणे परीक्षा देऊन स्वतःच्या ज्ञान, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर यश मिळविण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा राष्ट्रप्रेम, शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर संगम ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी विद्यालयाचे उपशिक्षक श्री. एन. जे. पाटील यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षक व सहकाऱ्यांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version