Spread the love

धम्म, अधम्म आणि सद्धम्म विषयावर वराड येथे वर्षावास प्रवचन

भारतीय बौद्ध महासभेच्या वर्षावास प्रवचन मालिकेतील चौथे पुष्प; धम्माचरणाचा उपासकांना संदेश

धुळे | प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा, धुळे जिल्हा शाखेच्या वतीने सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेतील चौथे पुष्प रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी वराड, ता. चोपडा, जि. जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. धम्म उपासक आयु. एकनाथ अना ढिवरे व ढिवरे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष पिरण अना ढिवरे, प्रमुख अतिथी भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र आण्णा महाले, वराडचे सरपंच अजय गवळी, ज्येष्ठ कामगार नेते भानुदास दादा भवरे, विभागीय सचिव प्रसेनजीत चव्हाण तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखेतील पदाधिकारी व धम्म उपासक यांच्या उपस्थितीत तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन करण्यात आले.

त्यानंतर सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. प्रवचनकार अशोक भाऊ शिरसाठ यांनी ‘धम्म, अधम्म आणि सद्धम्म’ या विषयावर मार्गदर्शन केले.

‘धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य’

प्रवचनातून मार्गदर्शन करताना अशोक भाऊ शिरसाठ म्हणाले की, “तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य मानला आहे. माणसाचे दुसऱ्याप्रती असलेले कर्तव्य जाणून घेणे, दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव व स्वीकार आणि दुःखाचा नाश करण्याचा मार्ग अवलंबणे हीच धम्माची आधारशिला आहे.”

प्रत्येकाने धम्मानुसार आचरण करताना धम्म, अधम्म आणि सद्धम्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. केवळ धम्माची माहिती असणे पुरेसे नसून, दैनंदिन जीवनात धम्ममूल्यांचे आचरण करणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.

मोठ्या संख्येने धम्म उपासकांची उपस्थिती

या कार्यक्रमास आयु. विजयकुमार देवरे, राजेश रामराजे, नानाजी अहिरे, यशोदाताई सपकाळे, हिराताई महाले, सुहास रामराजे, अनिल केदार, दिवानजी साळुंखे, गौतम जाधव, भुरेसिंग बाविस्कर, समाधान बाविस्कर, अशोक बाविस्कर, देवदत्त पानपाटील, नवल शिरसाठ, विजय ढिवरे, प्रदीप ढिवरे, देवराम पानपाटील, धनसिंग आढळके, उषाबाई मोरे यांच्यासह ढिवरे परिवारातील सदस्य व धम्म उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच उषाताई सोनवणे, दिपाली बाविस्कर, श्रीकांत सैंदाणे, लताताई सैंदाणे, मालुबाई ढवरे, हौसाबाई ढिवरे, विमलताई ढिवरे, वर्षा ढिवरे, सरलाबाई महीसरे, स्वराज बाविस्कर, जीत ढिवरे यांच्यासह ग्रामस्थ, बालक-बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. भास्कर शिरसाळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक सरणंतय घेण्यात आले. यानंतर ढिवरे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी खीरदान व भोजनदान करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version