Spread the love

रशियातून MBBS पदवी संपादन करून डॉ. प्रथमेश पाटील यांचे मायदेशी आगमन

पहानच्या शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने वैद्यकीय शिक्षणात मिळवले यश; मुंबई विमानतळावर कुटुंबीयांकडून जल्लोषात स्वागत

पहान | प्रतिनिधी

पहान येथील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले कै. दौलत रामदास पाटील (आप्पासाहेब) यांचे नातू, तसेच वडगाव सतीचे येथील रहिवासी डॉ. सुभाष दौलत पाटील यांचे पुतणे आणि पुणे येथील रहिवासी डॉ. शरद दौलत पाटील यांचे चिरंजीव डॉ. प्रथमेश शरद पाटील यांनी रशियातून MBBS ही वैद्यकीय पदवी यशस्वीपणे संपादन केली आहे.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉ. प्रथमेश पाटील यांचे आज सकाळी रशियातून मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे वडील डॉ. शरद पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी मुंबई विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे उत्साहात स्वागत केले.

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ. प्रथमेश यांनी परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मिळवलेले हे यश पहान परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. प्रथमेश पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान आणि पहान हडसन ग्रुप यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version