Spread the love

स्वप्निल सोनवणे यांचा ‘शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने होणार सन्मान

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; पुण्यातील भव्य सोहळ्यात पुरस्काराचे वितरण

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा युवासेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्निल सोनवणे यांना राज्यस्तरीय ‘शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता गट, जीवनदीप अनाथाश्रम व वृद्धाश्रम आणि तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून स्वप्निल सोनवणे यांची निवड झाली आहे.

सामाजिक कार्याची घेतली दखल

स्वप्निल सोनवणे यांनी गेल्या काही वर्षांत जळगाव ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

सोनवणे यांनी युवासेनेच्या माध्यमातून ‘माहेरची साडी’ आणि ‘नंदलक्ष्मी सुकन्या योजना’ यांसारखे अभिनव उपक्रम स्वखर्चातून राबविले आहेत. तसेच नानाश्री फाउंडेशनच्या माध्यमातून वृद्धाश्रमात अन्नदान, बालसुधारगृहात संस्कारक्षम पुस्तकांचे वाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, गरजू नागरिकांना उबदार कपड्यांचे वाटप आदी सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

विद्यार्थी संघटनेत कार्यरत असताना फीमाफीसह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर न्याय व हक्कासाठी लढा देत त्यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करण्याचे कामही त्यांनी केले आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच जळगाव ग्रामीणमधील विविध समस्या जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचेही सांगण्यात आले.

परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

स्वप्निल सोनवणे हे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे आणि नंदगावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या रजनी सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सोनवणे यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. पुणे येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

– स्वप्नील सोनवणे. मो. 9090807171

( पुरस्कार मिळाल्याची खात्री करण्यासाठी तथागत गृपचे अध्यक्ष संदिप गवई 9970467141 यांचा संपर्क क्रमांक )

Share.
Leave A Reply

Exit mobile version