Spread the love

इच्छापूर्ती हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला; महाआरती व महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी

पाचोरा | प्रतिनिधी :
पाचोरा शहरातील बळीराम पाटील नगर येथील इच्छापूर्ती हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन दिन भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिराची फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिनेश बापू आमले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी परिसरातील बजरंग भक्त, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी भाविकांचा मोठा जनसागर लोटला.

यावेळी शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक किशोर भाऊ पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, पदाधिकारी आणि असंख्य बजरंग भक्त उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त इच्छापूर्ती हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरण, जय हनुमानच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

मंदिर मित्रपरिवाराचे परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इच्छापूर्ती हनुमान मंदिर मित्रपरिवाराचे विठ्ठल महाजन, कमोद मिस्तरी, कैलास पाटील, भरत पाटील, जितू आबा सावळे, सुधाकर बापू चौधरी, रवींद्र सोनवणे, विकी पहिलवान, करतार चांगले, संदीप राजपूत, हर्षल धनगर, विकी सूर्यवंशी, गोपाल पाटील, सचिन वखरे, आकाश चौधरी, राहुल सावळे यांच्यासह मित्रपरिवारातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

वर्धापन दिनानिमित्त झालेल्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version